परब मराठा समाज, मुंबई नोंदणी क्र. प.ट्र.र.नं.ऐ/२७४३
मुख्य कार्यालय : प्रिती कान्हा (मनोहर बिल्डींग) सह.
गृहनिर्माण संस्था लि., ऐ विंग, ५ वा मजला, चितळे पथ, पोर्तुगीज चर्च जवळ, दादर
(प.), मुंबई -४०००२८.
स्थापना - दि. २२ डिसेंबर १९६३
संस्थापक - कै. श्री. पां. श्री. परब (गुरुजी)
हिरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल.....
सन्माननीय ज्ञाती बंधू - भगिनी,
सप्रेम नमस्कार,
१९६० च्या दशकात कळसुली गावचा एक शिक्षकी पेशातील तरुण आपले नशिब आजमवण्यासाठी
मुंबईला आला, मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागला, चरितार्थाची भ्रांत मिटली.
परंतु चरितार्थ हेच उद्दीष्ट नजरेसमोर न ठेवता समाज बांधवांचे आपण काहीतरी देणे
लागतो असे मनाशी ठरवून ज्ञाती बांधवांना एकत्र करुन दि. २२ डिसेंबर १९६३ रोजी
’परब मराठा समाज, मुंबई’ ही संस्था स्थापन केली. तो तरुण म्हणजेच आपल्या
संस्थेचे आद्य प्रवर्तक कै.श्री. पांडूरंग श्रीधर परब (गुरुजी) होत. त्यांच्या
स्मृतीस विनम्र आभिवादन!
सन १९६३ ते २०२० ह्या गेल्या ५७ वर्षांमध्ये समाजाच्या
बाबतीत वरील स्थित्यंतरे झाली. कै. परब गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून ज्या
ज्या समाज बांधवांनी त्यांना सहकार्य केले ते कै. वामनराव परब, कै. धर्मराज परब,
कै. हरिष परब, कै. नारायणराव परब, कै. शंकरराव परब, कै. नारायण मास्तर परब, कै.
अ. वि. परब, कै. अॅड. दिनकरराव परब, कै. जी. टी. परब, कै. डॉ. बी. बी. परब,
कै. बी. के. परब, कै. भास्करराव परब, कै. मधुकर गो. परब (कुवळेकर), कै. श्रीमती
उर्मिला परब, कै. जे. आर. परब, कै. एल. डी. परब, कै. शं. का. परब, कै. अरविंद
भानू परब, कै. डॉ. रमेश प्रभू तसेच श्री. अंकुश परब, श्री. ज. सी. परब, श्री.
एस. बी. परब, श्री. बी. आर. परब, श्री. बी. बी. परब, श्री. रावजी माळकर या
सर्वांना समाज बांधवांचा मानाचा मुजरा.
सत्तावन्न वर्षे झाली. सन २०२३ साली समाजाचा ’हिरक महोत्सव’
होऊ घातला आहे. हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान कार्यकारिणीने ज्ञाती
बांधव संपर्क अभियान यापुढेही राबविण्याचे ठरविले आहे. याद्वारे महाराष्ट्र,
गोवा, पुणे, बेळगाव, गुजरात तसेच मुंबईसह सिंधुदूर्गातील प्रत्तेक गावागावात
जाऊन सभासद नोंदणी करणे, संस्थेची ध्येय धोरणे, उद्दीष्टे ज्ञाती बांधवांपर्यंत
पोहचवणे. ज्ञाती समाजातील जे परब बांधव राजकिय, सामाजिक, कला, क्रिडा, वैद्यकिय
इत्यादी विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यांना मूळ प्रवाहात सामिल करुन घेणे,
जेणेकरुन त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा आपल्या इतर समाज बांधवांना घेता
येईल आणि त्यातूनच आपला समाज मोठा होणार आहे. समाज मोठा होणे म्हणजेच ज्ञाती
बांधवांची वैचारिक, सामाजिक व आर्थिक उंची वाढणे हे होय.
’परब मराठा समाज, मुंबई’ च्या पुढील
प्रमाणे सलंग्न संस्था व उपक्रम आहेत :
परब को. ऑप. क्रेडिट सोसायटी,
भांडूप
ही सहकारी तत्वावर चालणारी आर्थिक संस्था असून तिचे खेळते भांडवल आज सव्वा कोटी
इतके आहे. समाज बांधवांना वाजवी व्याजदरात कर्ज पुरवठा करुन ही संस्था हे एक
समाजकार्यच करीत आहे.
शिक्षण सेवा मुंबई
ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या व इतर समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्याना
मोफत वह्या वाटप करणे तसेच १० वी १२ वीच्या आपल्या व इतर सर्व समाजातील मुलांना
करिअर मार्गदर्शन, शिबीराद्वारे मार्गदर्श्न, समाजाच्या सभासदांच्या मुलांचा
रोख पारितोषिके देवून गुणगौरव करणे इत्यादी उपक्रम राबविले जातात. विशेषत:
आय.ए.एस, आय.पी.एस. सारख्या परिक्षांमध्ये उतीर्ण होऊन आपल्या परब बांधव
प्रशासकिय सेवेमध्ये सुध्दा विराजमान व्हायला हवा यासाठी १०वी पासूनच हुशार
विद्यार्थी हेरुन त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांची मानसिकता तयार करणे हे
महत्वाचे उद्दीष्ट समाजाने अंगिकारले आहे.
बालविकास व्यायाम मंदिर, घाटकोपर
ही संस्था गेली ४३ वर्षे घाटकोपर येथे मध्यमवर्गीय समाजातील मुलांना वाजवी
शुल्क घेऊन शरीर सुदृढ बनविण्याचे शिक्षण देत आहे. ह्या व्यायामशाळेत सुमार ३००
तरुण व्यायामाचे शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्याकरिता प्रशिक्षित शिक्षक
आहेत. ही व्यायामशाळा समाजाच्या स्वमालकीच्या जागेत असून सदर जागा समाजती एक
दानशूर व्यक्ती तथा कामगार नेते कै. श्री. आ. ल. परब यांनी संस्थेला दान केलेली
आहे. या व्यायामशाळेच्या जागेमध्ये लवकरच अद्ययावत व्यायामशाळेसह परब मराठा
समाजाचे एक टोलेजंगी ’परब भवन’ बांधण्याचा समाजाचा मानस आहे. हे परब भवन आपल्या
हिरक म्होत्सव सोहळ्यापर्यंत बांधून पुर्ण करण्याच्या दृष्टीने ठोस पावले
उचलणार आहोत.
उच्च शिक्षण निधी उपक्रम
ह्या उपक्रमाद्वारे समाजातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी
बिनव्याजी कर्ज पुरवठा केला जातो. सदर निधीच्या मुदतबंद ठेवीच्या व्याजातून अशा
मुलांना मदत केली जाते.
आरोग्य निधी उपक्रम
ह्या उपक्रमाद्वारे समाजातील ज्ञाती बांधवांना व त्यांच्या नातेवाईकांना असाध्य
आजारपणाच्या इलाजासाठी मदत केली जाते. अर्थात ह्या उपक्रमासाठी जो निधी बॅंकेत
जमा आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे इच्छा असूनही आपण आपल्या समाज बांधवांना भरीव
अशी मदत करु शकत नाही ही एक खंत आहे आणि म्हणूनच हा निधी हिरक महोत्सवी
वर्षापर्यंत रु. ५० लक्ष पर्यंत वाढविण्याचा संकल्प केलेला आहे.
वधू वर सूचक मंडळ
ह्या मंडळाद्वारे विविध समाजातील विवाह इच्छुक तरुण तरुणींची लग्न गाठ
बांधण्याचे सामाजिक कार्य गेली ३० वर्षे अविरत चालू आहे.
समाजातील विविध क्षेत्रात
उल्लेखनीय काम करणाऱ्या परब बांधवांची माहिती पुस्तिक तयार करणे.
समाजातील जे परब बांधव आपल्या कर्तुत्वाने नावारुपाला आलेले आहेत अशा विविध
क्षेत्रांतील नामवंत परब बांधवांची माहिती पुस्तिका बनविण्याचे काम हाती घेतलेले
आहे. त्या माहिती पुस्तिकेचे तत्वत: प्रकाशन सुवर्ण महोत्सवदिनी झालेले आहेच.
तथापि परब बांधवांची संख्या व व्याप्ती पाहता अद्याप कितीतरी परब बांधवांचा
त्यात अंतर्भाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आणि आपणांस ज्ञात असलेल्या
कर्तुत्ववान परब बांधवांची माहिती कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या तपशिल
फॉर्ममध्ये भरुन द्यावी. जेणेकरुन माहिती पुस्तिका त्वरेने तयार होऊन ती समाज
बांधवांच्या उपयुक्ततेसाठी उपलब्ध करुन देता येईल.
परब मराठा समाज, मुंबई
प्रिती कान्हा (मनोहर बिल्डिंग) सह.
गृहनिर्माण संस्था लि., ऐ विंग, ५ वा मजला, चितळे पथ, पोर्तुगीज चर्च
जवळ, दादर (प), मुंबई ४०००२८.